Chandrashekhar Bawankule | जितेंद्र आव्हाडांना जे बोलायचं ते बोलू द्या, निवडणुका होतील तेव्हा बघू, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
Chandrashekhar Bawankule | जितेंद्र आव्हाडांना जे बोलायचं ते बोलू द्या, निवडणुका होतील, तेव्हा कोणाच्या पायाखालची वाळू सरकते ते बघुयात, असा पलटवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
Chandrashekhar Bawankule | जितेंद्र आव्हाडांना (Jitendra Avhad) जे बोलायचं ते बोलू द्या, निवडणुका होतील, तेव्हा कोणाच्या पायाखालची वाळू सरकते ते बघुयात, असा पलटवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला. भाजप आणि राष्ट्रवादीत सध्या वाद प्रतिवाद सुरु आहे. दोन्ही खेम्यातील आमदारांनी सध्या एकमेकांवर टीकास्त्र सोडली आहेत. त्यात आता बावनकुळे यांनी आव्हाडाच्या टीकेला उत्तर दिले आहे. जितेंद्र आव्हाडांना सध्या बोलू द्या. 2024 निवडणुकांमध्ये काय होईल ते समजलेच, असा सूचक इशारा त्यांनी दिला. कोणाच्या पायखालची वाळू सरकते. कोण पराभूत होतो, हे समजेलच असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे जनतेच्या कल्याणासाठी योजना राबवत असल्याचे सांगत त्यामुळे भारत झपाट्याने विकास करत असल्याचा दावा त्यांनी केला.