ईडीची धाडीवर राऊत यांची तिखट शब्दाच टीका, म्हणाले, ‘आमचा बळी घेतला तरी घौडदोड सुरूच’ राहील!

ईडीची धाडीवर राऊत यांची तिखट शब्दाच टीका, म्हणाले, ‘आमचा बळी घेतला तरी घौडदोड सुरूच’ राहील!

| Updated on: Jun 21, 2023 | 4:16 PM

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय उद्योजक सुजित पाटकर यांच्यासह युवा सेनेचे कार्यकारणी सदस्य सुरज चव्हाण यांच्या घरावर आज ईडीने छापेमारी केली. त्यामुळे राज्यात एकदा खळबळ उडाली आहे.

मुंबई : लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीच्या माध्यमातून झालेल्या कथीत भ्रष्टाचार प्रकरणी आज ईडीने मुंबई 10 ते 15 ठिकाणी छापेमारी केली. यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय उद्योजक सुजित पाटकर यांच्यासह युवा सेनेचे कार्यकारणी सदस्य सुरज चव्हाण यांच्या घरावर आज ईडीने छापेमारी केली. त्यामुळे राज्यात एकदा खळबळ उडाली आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपसह ईडीवर निशाना साधला आहे. तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरून टीका केली आहे. त्यांनी, झाकिर नाईक यांच्याकडून चार साडेचार कोटी रुपये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संस्थेला का मिळाली असा सवाल केला आहे. तर याचा तपास सुद्धा या ईडीने करायला हवा. पण तसं होत नाही. हे कोणाला वाचवत आहेत? का फक्त शिवसेनेच्या लोकांवर धाडी घालणार आहात असा सवाल केला आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सुरू असलेली वाटचाल थांबविण्यासाठी असं करायचं असेल तर ठिक आहे. तुम्ही आमचे बळी घ्या, तुम्ही आमच्या गोळ्या चालवा, बंदूक रोका किंवा काहिही करा पण आमची घौडदोड सुरूच राहील असे ते म्हणाले.

Published on: Jun 21, 2023 04:09 PM