औरंगाबादमध्ये किराणा दुकाना बाहेर मिळतेय दारू; व्हिडिओ व्हायरल

औरंगाबादमध्ये किराणा दुकाना बाहेर मिळतेय दारू; व्हिडिओ व्हायरल

| Updated on: Oct 29, 2022 | 12:12 AM

तक्रारदाराने या भागात होत असलेल्या अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या लोकांचे स्टिंग ऑपरेशन केले.

औरंगाबाद : औरंगाबादच्या चिकलठाणा एमआयडीसी भागातील नारेगाव परिसरात गेल्या काही दिवसापासून अवैधरित्या दारू विक्री केली जात आहे. नागरिकांनी पोलीस आयुक्त कार्यालयात याबाबत तक्रार दाखल करून देखील पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे तक्रारदाराने या भागात होत असलेल्या अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या लोकांचे स्टिंग ऑपरेशन केले. स्टिंग ऑपरेशन करत असतानाचा व्हिडिओ सध्या औरंगाबाद मध्ये सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. शहरातील नारेगाव मध्ये किराणा दुकानाच्या बाहेर दारू विक्री केली जात असल्याचे या व्हिडिओतून पाहायला मिळत आहे.

Published on: Oct 29, 2022 12:12 AM