जरांगे यांचे संपूर्ण अनकट भाषण ऐका, सरकारला काय दिला नेमका इशारा
आपली पोरं या शहरात उभी आहेत. लेकराबाळाला पाणी लागलं तर पाणी द्या. त्यांना साथ द्या. गोरगरीबांच्या मराठ्यांना डिवचलं तर महाराष्ट्रातील मराठासमाज मुंबईत येईल हे लक्षात घ्या. आपण आडमुठेपणा करायला आलो नाही. न्यायासाठी आलोय. आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर मराठ्यांनी घरात थांबू नका. झाडूनपुसून मुंबईत या असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
नवी मुंबई | 26 जानेवारी 2024 : मनोज जरांगे यांनी सरकारने घेतलेले निर्णय चांगले असल्याचे म्हटले आहे. मात्र अनेक बाबींचे स्पष्टीकरण हवे असे म्हटले जरांगे यांनी म्हटले आहे. आपली महत्वाची मागणी आरक्षणाची आहे. अंतरवाली सराटीसह सर्व भागातील मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यासंदर्भात सरकारने आश्वासन दिले आहे. मात्र यावर सरकारने अध्यादेश काढावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मराठ्यांना संपूर्ण आरक्षण मिळेपर्यंत मराठ्यांना संपूर्णपणे मोफत शिक्षण देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. कारण जर सगे सोयऱ्याच्या व्याख्येत एखाद्यावर जर अन्याय झाला तर अडचण नको असे त्यांनी म्हटले आहे. 37 लाख नोंदी झाल्या आहेत असे सरकारने मान्य करीत त्या 57 लाखापर्यंत जाणार असे म्हटले आहे. सगे सोयऱ्यांसह आरक्षण देणार आहे असे सरकारने म्हटले आहे. परंतू त्याचा अध्यादेश दिलेला नाही. हा अध्यादेश रात्रीपर्यंत द्या. आम्ही प्रजासत्ताकाचा सन्मान करुन आज आझाद मैदान गेलेलो नाही. परंतू आज रात्री अध्यादेश दिला नाही. आम्ही उद्या मुंबईत जाणार हे मात्र लक्षात ठेवा असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. मोफत शिक्षण आणि राखीव जागा ठेवण्याचा आदेश हवा असेही त्यांनी म्हटले आहे.