इर्शारवाडीवर डोंगर कोसळला; मदतीसाठी स्थानिक तरुणांनी धाव घेतली!
रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 75 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दलाचे जवान यांच्यासह स्थानिक तरुणही मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.
रायगड, 20 जुलै 2023 | रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 75 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दलाचे जवान यांच्यासह स्थानिक तरुणही मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. या गावात जाण्यासाठी लोकं पायवाटेने मार्ग काढत मदतीसाठी पोहचतायत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी ही पथकं, जवान आणि नागरिक एकजुटीने कार्यरत आहेत. प्रशासन आणि नागरिक मिळून हे मदतकार्य करत आहेत. या लोकांना कोणताही त्रास होऊ नये आणि संपूर्ण माहिती मिळावी म्हणून प्रशासनाने हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. 8108195554 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे.
Published on: Jul 20, 2023 01:21 PM
Latest Videos