video : सांगली-मिरजेत 4 हॉटले पाडली; स्थानिकांनी आक्रमक होत केला पडळकरांवर आरोप
खाडे यांचा या प्रकरणाशी संबंध नसेल तर गोपीचंद पडळकर, ब्रम्हानंद पडळकर आणि त्यांच्यासोबत आलेले दीड-दोन हजार गुंड या सगळ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखिल करण्यात आली आहे.
मिरज : सांगलीतील मिरजमध्ये काल रात्री चार 4 हॉटले पाडण्यात आली. त्यावरून आता या पाडकामावर स्थानिकांनी आक्षेप घेतला आहे. तसेच ब्रह्मानंद पडळकर यांच्यावर आरोप केला. ब्रह्मानंद पडळकर यांच्याविरोधात स्थानिक आक्रमक झाले आहेत. तर ब्रह्मानंद पडळकर हे भाजपचे विधान परिषदेतेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू होत.
ब्रह्मानंद पडळकरांविरोधात आक्रमक झालेल्या स्थानिकांनी यावेळी यात पालकमंत्री सुरेश खाडे यांचाही यात हात आहे का हे जाहिर करावे अशी मागणी केली आहे. जर खाडे यांचा या प्रकरणाशी संबंध नसेल तर गोपीचंद पडळकर, ब्रम्हानंद पडळकर आणि त्यांच्यासोबत आलेले दीड-दोन हजार गुंड या सगळ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखिल करण्यात आली आहे.
मिरजेत दुकानं पाडण्यात आली आहेत. ते पाडकाम कायदेशीर आहेत, असं आमदार गोपीचंद पडळकर यांनी फोनवरून बोलताना या प्रकरणवर आपली प्रतिक्रिया दिली आहे