देशाचा मूड काय? 4 जूनला कुणाचं बनेल सरकार? आकडे अन् आकड्यांचा आधार?

| Updated on: May 23, 2024 | 10:31 AM

लोकसभा निवडणुकीची सद्यस्थिती पाहता एकूण ५४३ पैकी ४२८ जागांवर मतदान पूर्ण झालंय. तर ११५ जागा अद्याप शिल्लक आहे. २५ मे रोजी ६ वा टप्पा आणि १ जून रोजी ७ वा टप्प्यातील मतदान होणार आहे आणि ४ जूनला निकाल लागून देशाचा कौल कुणाला हे समोर येणार....

नुकत्याच राज्यासह देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्यात. तर देशात ४ जूनला कोणाचं सरकार बनणार यावरून दावे-प्रतिदावे सुरू आहेत. देशातील दोन नामवंत राजकीय विश्लेषकांचं याबाबत दोन वेगवेगळे दावे आहेत. एक दावा असा आहे की, यंदा एकटी भाजप ३०० चा आकडा पार करेल तर दुसरा दावा भाजपसह एनडीए बहुमताच्या खाली राहू शकतं. या दोन्ही दावांवरून चर्चा सुरू आहे. तर एनडीएचा आकडा ४०० नाही पण ३०० च्या पुढे हमखास असणार आणि दुसऱ्या दाव्यानुसार, एनडीए मिळूनही बहुमत हे अतिशय कट टू कट आकड्यांपर्यंत पोहोचून शकतं. लोकसभा निवडणुकीची सद्यस्थिती पाहता एकूण ५४३ पैकी ४२८ जागांवर मतदान पूर्ण झालंय. तर ११५ जागा अद्याप शिल्लक आहे. २५ मे रोजी ६ वा टप्पा आणि १ जून रोजी ७ वा टप्प्यातील मतदान होणार आहे आणि ४ जूनला निकाल लागून देशाचा कौल कुणाला हे समोर येणार….

Published on: May 23, 2024 10:31 AM
गजानन कीर्तिकर यांचा मुलाला बिनविरोध निवडून आणण्याचा कट होता, प्रवीण दरेकरांचा गंभीर आरोप
Pune Hit And Run Case : रईस बापाची औलाद सुटणार की अडकणार? बिघडलेल्या अल्पवयीन वेदांतचं पुढं काय?