‘शिवतीर्थ’वरील सभेत मोदी-राज ठाकरे एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?

| Updated on: May 15, 2024 | 3:21 PM

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातून राज ठाकरे यांनी महायुतीला जाहीर बिनशर्त पाठिबा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे दोघे एकाच व्यासपीठावरून महायुतीच्या प्रचाराची सांगता सभा घेणार आहे. दरम्यान, मनसैनिकांकडूनही महायुतीचा प्रचार जोमाने सुरू आहे.

मुंबईतील शिवतीर्थ अर्थात छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर सभेची जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठा बघायला मिळणार आहे. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातून राज ठाकरे यांनी महायुतीला जाहीर बिनशर्त पाठिबा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे दोघे एकाच व्यासपीठावरून महायुतीच्या प्रचाराची सांगता सभा घेणार आहे. दरम्यान, मनसैनिकांकडूनही महायुतीचा प्रचार जोमाने सुरू आहे. येत्या १७ मे रोजी शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे दोघं एकाच मंचावरून सभा घेणार असल्याने सगळ्यांची उत्सुकता वाढली आहे.

Published on: May 15, 2024 03:21 PM