Municipal Election : महाराष्ट्रामध्ये राजकीय घोळ? महानगरपालिकेच्या निवडणुकांवर राज ठाकरे यांचे परखड मत; म्हणाले...

Municipal Election : महाराष्ट्रामध्ये राजकीय घोळ? महानगरपालिकेच्या निवडणुकांवर राज ठाकरे यांचे परखड मत; म्हणाले…

| Updated on: Aug 14, 2023 | 2:35 PM

लोकसभा आणि महापालिकेच्या निवडणूका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष हे त्यांच्या त्यांच्या मोर्चे बांधणीला लागलेले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील कामाला लागली आहे.

पुणे, 14 ऑगस्ट 2023 | राज्यात येत्या काही महिन्यानंतर लोकसभा आणि महापालिकेच्या निवडणूका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष हे त्यांच्या त्यांच्या मोर्चे बांधणीला लागलेले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील कामाला लागली आहे. यावेळी पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांना आगामी लोकसभेवरून पुण्यात बैठक घेऊन कार्यकर्ते आणि नेत्यांना सज्ज राहण्याच्या सुचना दिल्या. यावेळी राज ठाकरे यांनी, आगामी काळात अनेक महत्वाच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवरच ही बैठक घेण्यात आली होती. तर आगामी लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी रणनिती आखली जात आहे. मात्र सध्याच्या राज्यातील घोळावरून यावर्षी काही महानगरपालिकांच्या निवडणूका लागतील असं काही वातावरण दिसत नाही. तर कोणीच आता या निवडणूका लावून आपल्या पायावर धोंडा मारून घेईल असही नाही. त्यामुळे लोकसभेच्याच निवडणूका लागतील. त्या दृष्टिकोनातनं आमच्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची चाचपणी होईल असे देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Published on: Aug 14, 2023 02:35 PM