Special Report : राष्ट्रवादीत भाकरी फिरली खरी, मात्र सुरू झालं प्रदेशाध्यक्ष नाट्य; जर अजित पवार नाही तर मग कोण?
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पद आपल्यास आता नको यातून मुक्त करा असं म्हणाले. त्यानंतर जर त्यांच्याकडून हे पद घेतलं तर त्यांना प्रदेशाध्यक्ष पद द्यावं लागेल आणि जयंत पाटील यांना मग कोणतं पद द्यावं असा प्रश्न आता राष्ट्रवादीसह शरद पवार यांच्या समोर उभा आहे.
मुंबई : आगामी लोकसभा आणि महापालिकांच्या निवडणुका पाहता सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र सध्या प्रदेशाध्यक्ष नाट्य सुरू झालं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पद आपल्यास आता नको यातून मुक्त करा असं म्हणाले. त्यानंतर जर त्यांच्याकडून हे पद घेतलं तर त्यांना प्रदेशाध्यक्ष पद द्यावं लागेल आणि जयंत पाटील यांना मग कोणतं पद द्यावं असा प्रश्न आता राष्ट्रवादीसह शरद पवार यांच्या समोर उभा आहे. तर यावरूनच आता मराठा आणि ओबीसी असेही पत्ते आता बाहेर पडत असून छगन भूजबळ यांनी आपल्याला विरोधी पक्ष नेते केल्यास जबाबदारी घेऊ असं म्हटलं आहे. तर अमोल मिटकरी यांनी प्रदेशाध्यक्ष पद घेत राज्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करावा त्यासाठी अजित पवार हेच योग्य असल्याचं म्हटलं आहे. त्यावरून नक्की राष्ट्रवादीत काय राजकारण रंगलय त्यावर हा स्पेशल रिपोर्ट