अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाले, जीवनभर...

अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाले, जीवनभर…

| Updated on: May 10, 2023 | 8:15 AM

चव्हाण हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा मध्यंतरी सूरु होत्या. मात्र आता चर्चांनाच बावनकुळे यांनी पूर्णविराम दिला. तर तशी कोणतीच चर्चा अशोक चव्हाण यांच्या सोबत झाली नाही, असं म्हटलेलं आहे.

नांदेड : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यानुसार येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे भाजपमध्ये प्रवेश करणार. तशा हालचाली सुरू आहेत, असं मोठं विधान शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केलं होतं. त्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी हा दावा खोडून काढला आहे. चव्हाण हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा मध्यंतरी सूरु होत्या. मात्र आता चर्चांनाच बावनकुळे यांनी पूर्णविराम दिला. तर तशी कोणतीच चर्चा अशोक चव्हाण यांच्या सोबत झाली नाही. त्यांची माजी भेट देखील झाली नाही. ते जीवनभर काँगेस मध्येच राहणार आहेत. तर मलाही जीवनभर भाजपमध्ये राहायचं आहे, अशी मिश्कील टिपण्णी बावनकुळे यांनी केली आहे. तर चव्हाण यांनी बजरंग दला (Bajrang Dal) बाबत टिपण्णी करु नये त्यांना महागात पडेल असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे.