VIDEO : राऊत यांना अजित पवार यांचा टोला; म्हणाले, ‘आमच्या शुभेच्छा…’
ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी स्वतःचे सरकार स्थापन करण्याचा इरादा बोलून दाखवला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले. यावरून मविआत आता सर्व काही अलबेल असल्याचं दिसत आहे.
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच मविआ आता शेवटच्या घटकाच मोजत आहे असे चित्र निर्माण झाले आहे. कारण आता पहिल्यांदाच ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी स्वतःचे सरकार स्थापन करण्याचा इरादा बोलून दाखवला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले. यावरून मविआत आता सर्व काही अलबेल असल्याचं दिसत आहे. राऊत यांनी आमच्या मनात असेल तोपर्यंत आम्ही महाविकास आघाडीमध्ये राहू नाहीतर स्वत: भगवा फडकवू असंही म्हटलं होतं. याच विधानावर अजित पवारांनी राऊतांना टोला लगावला. त्यांनी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आम्ही एकत्र यासाठी आलो कारण की शिंदे-भाजप विरुद्ध लढता यावं. पण आता राऊत असं बोलत आहेत. त्यांना आमच्या शुभेच्छा. तर याच्याआधी ते मविआ ही 25 वर्ष चालेल असं वाटत होतं. पण आता त्यांना त्यांच्या पक्षाचं स्वत:चं सरकार असावं असं वाटत असेल तर त्याच चुकीचं काय आहे? आमचं यावर काहीही म्हणणं नाही. अशी खोचक प्रतिक्रीया अजित पवारांनी दिली आहे.