बनावट मेजरनंतर आता तोतया नौदल अधिकारीही पोलीसांच्या जाळ्यात

बनावट मेजरनंतर आता तोतया नौदल अधिकारीही पोलीसांच्या जाळ्यात

| Updated on: Jun 21, 2023 | 7:54 AM

काहीच दिवसांपूर्वी पुण्यात दोन प्रकरणं तोतया अधिकाऱ्यांचे भांडे फुटलं होते. त्याचदरम्यान पुण्यात बनावट मेजर सापडला होता. हा कर्नाटकातील बनावट मेजर असून त्याचे नाव प्रशांत पाटील असे नाव आहे.

लोणावळा (पुणे) : सध्या अनेक काणाकोपऱ्यात अनेक तोतया अधिकारी हे पोलीसांच्या जाळ्यात सापडत आहेत. काहीच दिवसांपूर्वी पुण्यात दोन प्रकरणं तोतया अधिकाऱ्यांचे भांडे फुटलं होते. त्याचदरम्यान पुण्यात बनावट मेजर सापडला होता. हा कर्नाटकातील बनावट मेजर असून त्याचे नाव प्रशांत पाटील असे नाव आहे. त्यापाठोपाठ आता तोतया नौदल अधिकाऱ्याचा लोणावळा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तोतया नौदल अधिकारी आकाश काशिनाथ डांगे असं आरोपीचे नाव आहे. तर त्याच्या दोन साथिदारांनाही पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जयराज चव्हाण, अभय काकडे अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत.

नौदलात कमांडंट पदावर नोकरीस असल्याची बतावणी करत लोणावळा व आसपासच्या परिसरातील मुलांना तो फसवत असे. लोणावळ्यातील आयएनएस शिवाजी येथे नोकरी लावण्याचे आमिष दाखवून प्रत्येकी तीन लाख रुपये त्याने उकळले होते. तर तिच रक्कम घेण्यासाठी तो लोणावळ्यात आला होता. यावेळी लोणावळा नेव्हल पोलीस टीम आणि लोणावळा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या तिघांना ताब्यात घेतले. तर यांच्याकडून पंधरा लाख रुपये किंमतीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

Published on: Jun 21, 2023 07:54 AM