लोणवळ्यात रिमझिम पाऊस; निसर्ग बहरल्यामुळे वातावरण नयनरम्य

लोणवळ्यात रिमझिम पाऊस; निसर्ग बहरल्यामुळे वातावरण नयनरम्य

| Updated on: Sep 15, 2022 | 11:25 AM

गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या लोणावळा परिसरातही पावसासह धुक्याची चादर पसरली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या लोणावळा परिसरातही पावसासह धुक्याची चादर पसरली आहे. मुंबई पुणे महामार्गावर रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने लोणावळ्या परिसरात निसर्गाचे वेगळे रुप पाहायला मिळत आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर जोरदार आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊनही येथील वाहतूक मात्र सुरळीत सुरु आहे. पावसाचा कोणताही परिणाम वाहतुकीवर झाला नसून वाहतूक सुरळीत चालू असून रिमझिम पावसामुळे येथील निसर्गाला सुंदर रुप प्राप्त झाले आहे. निसर्गाचे वेगळे रुप दिसत असल्यामुळे निसर्गप्रेमींसाठी लोणवळा एक पर्वणी बनली आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात पाऊस होत असल्याने परिसरही हिरवळीनं नटून गेला आहे.

Published on: Sep 15, 2022 11:25 AM