लालबागच्या राजाच्या दर्शनाला जात असाल तर हा व्हिडीओ नक्की बघा

| Updated on: Sep 14, 2024 | 12:19 PM

मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाची धुम पाहायला मिळत आहे. घरोघरी लाडक्या बाप्पाचं आगमन झाल्यानंतर गौरी-गणपती आणि सात दिवसाच्या बाप्पांना जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्व भक्तगण सार्वजनिक मंडळासह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी घराबाहेर पडले आहेत.

Follow us on

गणरायाच्या निरोपासाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पाच दिवसाचे आणि गौरी-गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर भाविकांची लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याचे सध्या पाहिला मिळत आहे. लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी त्याला डोळेभरून पाहण्यासाठी आणि वर्षभरासाठी त्याचं रूप मनात साठवून ठेवण्यासाठी लालबागमध्ये दिवस रात्र भाविकांची मोठी गर्दी होत आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी अवघे तीन दिवस बाकी असल्याने सगळेच भाविक घराबाहेर पडत असून बाप्पाचं दर्शन घेत आहेत. त्यामुळे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग पाहायला मिळत आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांच्या जवळपास दीड ते दोन किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच भाविकांची गर्दी काही कमी होताना दिसत नाहीये. आज गणेशोत्सवाचा आठवा दिवस असून आपल्याला लाडक्या बाप्पाचं दर्शन व्हावं म्हणून लालबाग परिसरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.