लव्ह जिहाद आणि धर्मांतरण मुद्द्यावर नितेश राणेंचं उत्तर, म्हणाले...

लव्ह जिहाद आणि धर्मांतरण मुद्द्यावर नितेश राणेंचं उत्तर, म्हणाले…

| Updated on: Mar 14, 2023 | 2:39 PM

मंगल प्रभात लोढा यांनी चुकीची माहिती दिल्याचा आरोप देखिल राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. त्यावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी काही दिवस थांबा, सगळ्यांना उत्तर मिळेल असं म्हटलं आहे

मुंबई : राज्याच्या अधिवेशनामध्ये अनेक विषयांवर चर्चा झाल्या. यावेळी लव्ह जिहाद आणि धर्मांतरण मुद्द्यावरही जोरदार चर्चा जाली. यावेळी याविषयावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडा जंगी पहायला मिळाली. मंगल प्रभात लोढा यांनी चुकीची माहिती दिल्याचा आरोप देखिल राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. त्यावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी काही दिवस थांबा, सगळ्यांना उत्तर मिळेल. त्यांना लव्ह जिहादसह धर्मांतरण कसे होते याचे पुरावेच दिले जातील. सगळ्यांना उत्तर मिळेल असे म्हटलं आहे. यावेळी राणे यांनी, आकड्यांच्या खेळामध्ये कशाला पडायला पाहिजे. आपल्याला 1 लाख किंवा 3 हजार हा आकडा महत्वाचा नाही. तर 1 हा आकडा महत्वाचा आहे. जर एकाही हिंदू मुलीचे आयुष्य खराब होत असेल ते म्हत्वाचे आहे. पहा अजून काय म्हणाले, नितेश राणे…

Published on: Mar 14, 2023 02:37 PM