अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा; रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुढील तीन दिवस रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रत्नागिरी, 02 ऑगस्ट 2023 | गेल्या आठवड्यात पजलेल्या अतिमुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपलं होतं. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्याने रत्नागिरी जिल्ह्याला दिलासा मिळाला होता. मात्र आता अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुढील तीन दिवस रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पहाटेपासून रत्नागिरी रिमझिम पाऊस पडत आहे. यावर्षीच्या पावसाने गेल्या वर्षीच्या पावसाची सरासरी मागे टाकली आहे.जुलैच्या अखेरीपर्यंत 2130 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीपेक्षा 400 मीटर पाऊस अधिक पडला आहे. गेल्या पंधरा दिवसात पडलेल्या पावसानं दोन महिन्याची सरासरी पूर्ण केली.
Published on: Aug 02, 2023 12:05 PM
Latest Videos