Special Report | घरगुती सिलेंडर पुन्हा 50 रुपयांनी महागला!

| Updated on: May 07, 2022 | 11:47 PM

सिलिंडरचे दर महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडण्याची शक्यात आहे.  1 मे रोजी व्यवसायिक सिलिंडरचे दर वाढवण्यात आले होते. व्यवसायिक सिलिंडर पाठपाठ आता घरगुती गॅसच्या दरात देखील वाढ करण्यात आली आहे.

मुंबई : वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीमध्ये आता महागाईचा आणखी एक धक्का बसला आहे. तो म्हणजे घरगुती 14.2 किलोच्या गॅस सिलिंडरचे दर वाढवण्यात आले आहेत. घरगुती सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 50 रुपयांच्या वाढीसह घरगुती सिलिंडरचे दर आता 999.50 रुपयांवर पोहोचले आहेत. म्हणजेच इथून पुढे एका सिलिंडरसाठी  हजार रुपये मोजावे लागणार आहेत. सिलिंडरचे दर महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडण्याची शक्यात आहे.  1 मे रोजी व्यवसायिक सिलिंडरचे दर वाढवण्यात आले होते. व्यवसायिक सिलिंडर पाठपाठ आता घरगुती गॅसच्या दरात देखील वाढ करण्यात आली आहे.

Published on: May 07, 2022 11:47 PM