देशात 'लम्पीचा' कहर; देशभरात 82 हजार जनावरांचा मृत्यू; राज्यातील मृत्यूचा आकडाही मोठा

देशात ‘लम्पीचा’ कहर; देशभरात 82 हजार जनावरांचा मृत्यू; राज्यातील मृत्यूचा आकडाही मोठा

| Updated on: Sep 19, 2022 | 7:50 PM

देशात लम्पी आजाराने धुमाकूळ घातला आहे. या आजारामुळे शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. लम्पीमुळे देशात आतापर्यंत एकूण 82 हजार जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे राज्यात देखील लम्पीचा वेगाने प्रादुर्भाव होत आहे.

मुंबई : देशात लम्पी (Lumpy) आजाराने धुमाकूळ घातला आहे. या आजारामुळे शेतकरी (farmer) चांगलेच धास्तावले आहेत. लम्पीमुळे देशात आतापर्यंत एकूण 82 हजार जनावरांचा (cattle) मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे राज्यात देखील लम्पीचा वेगाने प्रादुर्भाव होत असून, राज्यात आतापर्यंत 187 जनावरे या आजाराचे बळी ठरले आहेत. लम्पीचा वाढता प्रादर्भाव पहाता सरकार सतर्क झाले असून, साथ नियंत्रणासाठी प्रत्येक जिल्ह्याला एक कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.  तसेच देशभरात लम्पीच्या लसीकरणाला देखील वेग येत आहे. लम्पी या आजारामुळे अचानक गुरे दगावत असल्याने याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. लम्पीच्या नियंत्रणासाठी जिल्हा स्थरावर प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. वेगवेगळ्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत.

 

 

Published on: Sep 19, 2022 08:51 AM