पंतप्रधानांच्या पदवीवरून राऊतांचा चिमटा; म्हणाले, ही ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पदवी

पंतप्रधानांच्या पदवीवरून राऊतांचा चिमटा; म्हणाले, ही ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पदवी

| Updated on: Apr 03, 2023 | 9:31 AM

राऊत यांनी आपले पंतप्रधान मोदीजींची ही पदवी बोगस असल्याचे लोक म्हणतात, पण 'Entire Political Science' या संशोधन विषयावरील ही ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पदवी आहे, असे माझे मत आहे

मुंबई : महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगर येथे पहिली एकत्रित जाहीर सभा पार पडली. या जाहीर सभेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार घणाघात केला. त्यांनी, अनेकजण पदव्या दाखवतात पण किंमत मिळत नाही. तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधानांना पदवी दाखवा म्हणून मागितलं तर 25 हजारांचा दंड बसतो अशी टीका केली होती. यानंतर आता उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पात्रतेवर जोरदार हल्ला चढवला आहे. राऊत यांनी ही टीका ट्विट करत केली आहे.
राऊत यांनी आपले पंतप्रधान मोदीजींची ही पदवी बोगस असल्याचे लोक म्हणतात, पण ‘Entire Political Science’ या संशोधन विषयावरील ही ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पदवी आहे, असे माझे मत आहे. ती फ्रेम करून नवीन संसद भवनाच्या मुख्य गेटवर टांगली जावी. जेणेकरून लोक पंतप्रधानांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाहीत.

Published on: Apr 03, 2023 09:31 AM