Mahadev Gitte : मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
Beed Jail Dispute News : बीड करागृहात झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर आता आरोपीप महादेव गीते आणि इतर चार आरोपींना संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात हलवण्यात आलं आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले याला बीड तुरुंगात महादेव गीतेच्या टोळीकडून झालेल्या मारहाणीनंतर आता महादेव गीते याची रवंगणी संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात करण्यात आली आहे. त्याच्यासोबत इतरही 4 आरोपींना बीड कारागृहातून हर्सुल कारागृहात पाठवण्यात आलं आहे. यावेळी पोलीस व्हॅनमध्ये बसताना वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झाली असल्याचं महादेव गीते याने म्हंटलं आहे. आम्हालाच मारहाण करून वर आम्हालाच दुसऱ्या कारागृहात पाठवत आहेत. पोलीस प्रशासन त्यांना पूर्ण मदत करत आहे, असा गंभीर आरोपही यावेळी गीतेकडून करण्यात आला आहे.
एकीकडे तुरुंग प्रशासन मारहाण झाल्याचा दावा फेटाळत असला तरी, दुसरीकडे मात्र तातडीने 4 आरोपींना बीड कारागृहातून हलवण्यात आलं आहे. तर महादेव गीते आणि अक्षय आठवले यांच्याकडून मारहाण झालेली असल्याचा दाव्याला दुजोरा देण्यात आलेला आहे. तसंच सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची देखील मागणी करण्यात आली आहे.

हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट

मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा

'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत

....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्
