Mahadev Gitte : हत्या प्रकरणात जेलमध्ये आला, कराडने फसवल्याचा आरोपही केला.. कराडला मारणारा महादेव गीते कोण?
Who Is Mahadev Gitte : वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण करणारा महादेव गीते नेमका कोण? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या महादेव गीतेकहा वाल्मिक कराड सोबत जुना वाद असल्याचं समोर आलं आहे.
बीडच्या तुरुंगात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण करण्यात आलेली आहे. तुरुंगातील आरोपी महादेव गीते याने आपल्या साथीदारांसह ही मारहाण केलेली आहे. त्यामुळे आता हा महादेव गीते कोण? त्याचा वाल्मिक कराडसोबत असलेला जुना वाद काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
कराडला मारहाण करणारा महादेव गीते हा बापू आंधळे हत्या प्रकरणात सध्या बीडच्या कारागृहात आहे. आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा गीते याचा वाल्मिक कराडवर आरोप आहे. जून 2024 मध्ये याच महादेव गीतेच्या घरावर देखील गोळीबार झाला होता. हा गोळीबार वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच झाला असा आरोप गीतेने केला होता. अक्षय आठवले याने देखील कराडला मारहाण करण्यात गीतेला साथ दिली आहे.

त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय

'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी

'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात

'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
