“…तर अजित पवार यांना फोडण्याची गरज नव्हती”, महादेव जानकर यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे भाजपावर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. दरम्यान महादेव जानकर यांनी अजित पवार यांच्या बंडावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
अहमदनगर, 23 जुलै 2023 | गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे भाजपावर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. दरम्यान महादेव जानकर यांनी अजित पवार यांच्या बंडावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. जानकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, एकनाथ शिंदे आल्यावर फायदा होईल. आता म्हणतात, अजित पवार आल्यावर फायदा होईल. तसेच परत दोन महिन्यांनी म्हणतील, आता साराच आपला बेस निघून गेलाय. भाजप जर एवढा मोठा पक्ष होता तर अजित पवारांना फोडण्याची गरज नव्हती.
Published on: Jul 23, 2023 09:37 AM
Latest Videos