रत्नाकर गुट्टे रासप सोडणार? महादेव जानकर म्हणतात, ‘ते मेले तरी…’
काही दिवसांपूर्वी बावनकुळे यांनी 2024 विधानसभेसाठी रत्नाकर गुट्टे गंगाखेड येथून आमचे उमेदवार असतील, असे विधान केले होते. ज्यामुळे रत्नाकर गुट्टे रासप सोडणार का अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या.
परभणी, 06 ऑगस्ट 2013 |काहीच महिन्यांच्या अवधीनंतर राज्यात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजणार आहेत. त्याच्या तयारीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्याचपार्श्वभूमिवर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची जन स्वराज्य यात्रा सुरू झाली आहे. याच्याआधी देखील जानकर यांनी जागा वाटप आणि मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजपवर तोफ डागली होती. यानंतरच त्यांनी जन स्वराज्य यात्रेची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांची ही यात्रा गंगाखेडमध्ये आली असताना जानकर यांनी रत्नाकर गुट्टे यांच्या कार्यालयाला भेट दिली. तर याचदरम्यान जानकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गुट्टे यांच्या उमेदवारीच्या विधानावर वक्तव्य केलं. त्यांनी, बावनकुळे यांच्या विधानाचा गैर अर्थ काढण्यात आला. बावनकुळे यांना आमचे म्हणजे भाजप रासप युतीचे उमेदवार अस म्हणायचं होत, अस ही सांगायला जानकर विसरले नाहीत असा टोला लगावला. तसेच तसेच मेले तरी रत्नाकर गुट्टे राष्ट्रीय समाज पक्ष सोडणार नाही!! असं विधान देखील जानकर यांनी केलं. तर काही दिवसांपूर्वी बावनकुळे यांनी 2024 विधानसभेसाठी रत्नाकर गुट्टे गंगाखेड येथून आमचे उमेदवार असतील, असे विधान केले होते. ज्यामुळे रत्नाकर गुट्टे रासप सोडणार का अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या. मात्र आता यावरून जानकर यांनीच टोला लगावल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत.