Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी आत्महत्या करेन पण, कमळ... ; महादेव जानकर नेमकं काय म्हणाले? पाहा व्हिडीओ...

“मी आत्महत्या करेन पण, कमळ… “; महादेव जानकर नेमकं काय म्हणाले? पाहा व्हिडीओ…

| Updated on: Jul 12, 2023 | 12:47 PM

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर पक्षांप्रमाणे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी मोर्चेबांधणी सुरुवात केली आहे. रासपची जनस्वराज्य यात्रा मंगळवारी फलटणध्ये पार पडली. यावेळी जानकर यांनी जोरदार फटकेबाजी करत सत्ताधारी आणि विरोधकांना इशारा दिलाय.

सातारा: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर पक्षांप्रमाणे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी मोर्चेबांधणी सुरुवात केली आहे. रासपची जनस्वराज्य यात्रा मंगळवारी फलटणध्ये पार पडली. यावेळी जानकर यांनी जोरदार फटकेबाजी करत सत्ताधारी आणि विरोधकांना इशारा दिलाय. ते म्हणाले की, “एक काळ असा होता जेव्हा माझे सगळे सहकारी, मित्रपक्ष त्यांचं चिन्ह घेऊन निवडणूक लढवू लागले होते. माझ्यावरही दबाव होता. मला त्यांनी सांगितलं तुम्हाला कमळ चिन्ह घ्यावं लागेल. मी त्यांना म्हटलं माझा राजीनामा घ्या, मी गावाकडं जाऊन शेती करेन. मला तुमची काही गरज नाही. मला हे सरकार नको आहे. मी तसं म्हटल्यावर त्यांनी मला सांगितलं तुमच्या चिन्हावर निवडणूक लढा.मागची लोकसभेची निवडणूक लढवावी आणि कमळ चिन्हावर ही निवडणूक लढवावी, अशी इच्छा भाजपने व्यक्त केली होती. मात्र, मी आत्महत्या करेन पण…” महादेव जानकर पुढे काय म्हणाले यासाठी पाहा हा व्हिडीओ…

Published on: Jul 12, 2023 12:47 PM