Ashadhi Wari : टाळ-मृदंगात रंगले महादेव जानकर
आषाढी एकादशी ही आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. राज्यभरातून दिंड्या आता सोलापूर जिह्यात दाखल झाल्या असून इंदापूर येथे विठ्ठलाच्या मूर्तीचे दर्शन जानकर यांनी घेतले. एवढेच नाहीतर टाळही गळ्यात घालून ते भक्तीमय वातावरणात दंग झाले होते.
इंदापूर : गेल्या काही दिवसांपासून राजकारणापासून अलिप्त असलेले महादेव जानकर हे थेट आता आषाढी वारीमध्ये दिसले आहेत. आषाढी एकादशी ही आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. राज्यभरातून दिंड्या आता सोलापूर जिह्यात दाखल झाल्या असून इंदापूर येथे विठ्ठलाच्या मूर्तीचे दर्शन जानकर यांनी घेतले. एवढेच नाहीतर टाळही गळ्यात घालून ते भक्तीमय वातावरणात दंग झाले होते. हातामध्ये टाळ घेऊन ते विठुरायाचा जयघोष करीत होते. इंदापूर तालुक्यातील सुरवड गावात दिंडी दाखल होताच त्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. तर आकलूज चौक येथे त्यांनी विठुरायाचे दर्शन घेतले. आषाढी वारी ही आता 8 दिवसांवर येऊन ठेपली आहे.
Published on: Jul 07, 2022 09:27 PM
Latest Videos