आम्हाला मंत्रिपद हवं, अन्यथा..., महादेव जानकर यांचा भाजपला गंभीर इशारा

“आम्हाला मंत्रिपद हवं, अन्यथा…”, महादेव जानकर यांचा भाजपला गंभीर इशारा

| Updated on: Jun 27, 2023 | 9:00 AM

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अजून रखडलेला आहे. मात्र या मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळेल, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे. त्यात आता रासप पक्षाचे महादेव जानकर यांनी मंत्रिमंडळात स्थान मिळावं, असं म्हटलं आहे.

नाशिक : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अजून रखडलेला आहे. मात्र या मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळेल, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे. त्यात आता रासप पक्षाचे महादेव जानकर यांनी मंत्रिमंडळात स्थान मिळावं, असं म्हटलं आहे. ते म्हणाले की, “आम्ही एनडीए मध्ये आहोत. पण आम्हाला लोकसभेला जागा मिळाली नाही. मी स्वतःच्या हिंमतीवर पक्ष चालवतो. आम्ही म्हणतो एनडीएमध्ये आहे. पण ते जाहीरपणे म्हणत नाही. ज्यावेळी माझे 50 आमदार असतील, त्यावेळी मी बोलेल. मी इंजिनियरिंगचा विद्यार्थी आहे. त्यामुळे मी प्रॅक्टिकल वागतो. आम्ही भाजपसोबत आहे. आम्हाला विधानसभेला, लोकसभेला जागा मिळाली नाही. आम्ही बंडखोरी करून शेवटी आमचा आमदार निवडून आणला. भाजपला मित्र पक्षाची गरज आहे.पण त्यांनी मित्र पक्षाची वाट लावली आहे. आमची स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू आहे. आम्ही भाजपला म्हणणार नाही, आम्हाला काही द्या म्हणून. त्यांनी आम्हाला जागा द्याव्यात. आम्हाला मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रिपद हवं. आमचं हेलिकॉप्टर जर लॅन्ड झालं तर, आम्ही आमची ताकद दाखवून देऊ,” असं त्यांनी म्हटलं.

Published on: Jun 27, 2023 09:00 AM