Video : महादेव जानकर आता राष्ट्रवादीच्या कोट्यातून येथून लोकसभा लढविणार

Video : महादेव जानकर आता राष्ट्रवादीच्या कोट्यातून येथून लोकसभा लढविणार

| Updated on: Mar 30, 2024 | 8:09 PM

आपण महायुतीकडे दोन जागा मागितल्या होत्या, त्यातील त्यांनी एक जागा त्यांनी दिली आणि महाविकास आघाडीकडे मी तीन जागा मागितल्या होत्या, त्यापैकी एकही मिळाली नाही. त्यामुळे पन्नास टक्के भागीदारी दिल्याबद्दल आपण महायुतीचे आभार मानत असल्याचे महादेव जानकर यांनी म्हटले आहे.

मुंबई : राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांना महायुती आणि महाआघाडी अशा दोन्हींकडे लोकसभा लढविण्यासाठी आशा लावून बसले होते. माढा येथून महायुतीने आपला उमेदवारी जाहीर केल्याने आणि महाविकास आघाडी परभणी द्यायला तयार नसल्याने त्यांची अडचण झाली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना देखील भेटले असताना अचानक महायुतीने त्यांना आपल्याकडे ओढले होते. आता महादेव जानकर यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार यांना आपल्या कोट्यातील परभणीची जागा दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेत महादेव जानकर यांना परभणी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. परभणीमध्ये जानकर यांची लढत शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय बंडू जाधव यांच्याशी होणार आहे. आपल्या छोट्या पक्षाला सामावून घेतले आहेत त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानले होते. मी महायुतीला दोन जागा मागितल्या होत्या त्यातील त्यांनी एक दिली आणि महाविकास आघाडीकडे मी तीन जागा मागत होतो, त्यापैकी एकही मिळाली नाही. त्यामुळे पन्नास टक्के भागीदारी दिल्याबद्दल आपण महायुतीचे आभारी असल्याचे महादेव जानकर म्हणाले.

Published on: Mar 30, 2024 08:08 PM