भाजपने उशीरा का होईना पण निर्णय घेतला : पवार असं का म्हणाले, पहा महाफास्ट न्यूज 100

भाजपने उशीरा का होईना पण निर्णय घेतला : पवार असं का म्हणाले, पहा महाफास्ट न्यूज 100

| Updated on: Oct 17, 2022 | 4:37 PM

आपल्या आवाहनाला भाजपने घेतेल्या निर्णयाचा आनंद आहे. भाजपने उशीरा का होईना पण आपला निर्णय घेतल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी माघार घेतली आहे. याबाबतची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी केली. यामुळे ठाकरे गटाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग हा मोकळा झाला आहे. तर पक्षाने दिलेल्या आदेशावर आपली प्रतिक्रिया देताना, मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. अपक्ष म्हणन निवडणूक लढवणार नाही असं भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी माघारीनंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तर आपल्या आवाहनाला भाजपने घेतेल्या निर्णयाचा आनंद आहे. भाजपने उशीरा का होईना पण आपला निर्णय घेतल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांचं नेतृत्व हे कोत्यामनाचं आहे. त्यामुळेच त्यांनी शरद पवार यांना पुढे करत भाजपला अर्ज मागे घ्यायला लावला. तसेच मनसे प्रनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखिल भाजपच्या माघारीवर आपले मत प्रकट करताना फडणवीसांचे आभार मानले आहेत.

Published on: Oct 17, 2022 04:37 PM