तर नारायण राणे तुरूंगातून ५० वर्षे सुटणार नाहीत... पहा महाफास्ट न्यूज 100

तर नारायण राणे तुरूंगातून ५० वर्षे सुटणार नाहीत… पहा महाफास्ट न्यूज 100

| Updated on: Jan 06, 2023 | 9:59 PM

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांवर टीका करत त्यांची मुजोरी अजूनही सुरूच असल्याचं म्हटलं आहे. तर रोहीत पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाना साधत विरोधकांना उर्फीत अडकवलं. आणि योगी बर्फी घेऊन गेले असा टोला शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे.

मुंबई : राज्यातील फटाफट घडामोडी अंतर्गत आज राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मत्री नारायण राणे यांच्यावर हल्ला चढवला. तसेच नारायण राणे लांब रहा. आम्ही तुमचे प्रकरणे बाहेर काढली तर नारायण राणे तुरूंगातून ५० वर्षे सुटणार नाहीत असा दमच राऊत यांनी दिला आहे. तसेच राऊत यांनी राणे यांचा एकेरी उल्लेख देखिल केला आहे.

त्याचबरोर अजित पवार यांनी नितेश राणे यांना टिल्ल्या अशी दिलेली उपमा बरोबर असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. तर नितेश हे नुसते शरीरयष्टीनेच टिल्ले नाहीत, त्यांची बुद्धीच टिल्ली झाली आहे असाही घणाघात त्यांनी केला. तर अजित पवार यांनी विरोधकांवर पुन्हा एकदा निशाना साधताना आपल्या १० पिढ्यांकडून देखिल अवमान होणार नाही असं म्हटलं आहे.

तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांवर टीका करत त्यांची मुजोरी अजूनही सुरूच असल्याचं म्हटलं आहे. तर रोहीत पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाना साधत विरोधकांना उर्फीत अडकवलं. आणि योगी बर्फी घेऊन गेले असा टोला शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे.

Published on: Jan 06, 2023 06:13 PM