उद्धव ठाकरेंनी का मागितले आणखीन काही दिवस? यासह इतर बातम्यांच्या अपडेटसाठी पहा महाफास्ट न्यूज 100

उद्धव ठाकरेंनी का मागितले आणखीन काही दिवस? यासह इतर बातम्यांच्या अपडेटसाठी पहा महाफास्ट न्यूज 100

| Updated on: Oct 07, 2022 | 7:22 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. तर छोटा राजन आणि शकील याला आपल्याला जीवे मारण्याची सुपारी ठाकरे यांनी दिल्याचे ते म्हणाले.

खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न आता निवडणूक आयोगाकडे गेला आहे. त्याचा येता काही दिवसात निकाल लागण्याची शक्यता आहे. तर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्यासह शिंदे गटाला कागदपत्रं जमा करण्यास सांगितलं होतं. त्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी शिवसेना संदर्भातील कागदपत्रं आयोगासमोर सादर केली आहेत. तसेच ठाकरे यांनी 180 राष्ट्रीय कार्यकारणींची यादी जोडली आहे. तर 2 ते 3 लाख प्रतिनिधींची यादी जोडण्यासाठी आणखीन मुदत वाढ मागितली आहे. याच वेळी शिंदे गटाकडूनही निवडणूक आयोगासमोर कागद पत्रं जमा करण्यात आली. शिंदे गटाच्या वकीलांनी शेवटच्या क्षणी कागद पत्रांचे 7 ते 8 गठ्ठे जमा केले. यामध्ये शिंदे गटात गेलेल्या 40 आमदार 12 खासदार आणि 1.5 लाख प्रतिनिधींची यादी जोडण्यात आली आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. तर छोटा राजन आणि शकील याला आपल्याला जीवे मारण्याची सुपारी ठाकरे यांनी दिल्याचे ते म्हणाले.

 

Published on: Oct 07, 2022 07:22 PM