MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 30 June 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 30 June 2021

| Updated on: Jun 30, 2021 | 8:34 AM

अहमदनगर महापौरपदाची निवडणूक बिनविरोध झाली असून औपचारिक घोषणा बाकी आहे. त्याच्या आदल्या रात्री सेनेच्याच दोन गटांमध्ये राडा झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अहमदनगर महापौरपदाची निवडणूक (Ahmednagar Mayor Election) अवघ्या काही तासांवर आली असताना शिवसेनेच्या दोन गटात राडा पाहायला मिळाला. महापौर निवडीवरुन अहमदनगरमधील शिवसेना नगरसेवकांमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास वादावादी झाली. यावेळी शिवसेना नगरसेविकेचे पती निलेश भाकरे यांना मारहाण झाल्याचा आरोप आहे.

शिवसेना नगरसेवक अनिल शिंदे आणि निलेश भाकरे यांच्यात वाद झाल्याची माहिती आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनाही धक्काबुक्की झाल्याची चर्चा होती, मात्र आपल्याला कोणतीही धक्काबुक्की झाली नसल्याचं स्पष्टीकरण कोरेगावकरांनी दिलं आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर महापौरपदाची निवडणूक बिनविरोध झाली असून औपचारिक घोषणा बाकी आहे. त्याच्या आदल्या रात्री सेनेच्याच दोन गटांमध्ये राडा झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Published on: Jun 30, 2021 08:34 AM