MahaFast News 100 | बंड आणि गद्दारी आज फरक असतो; सावंत यांच्यावर राऊत गरजले, म्हणाले, शिंदे गट गद्दार

MahaFast News 100 | बंड आणि गद्दारी आज फरक असतो; सावंत यांच्यावर राऊत गरजले, म्हणाले, शिंदे गट गद्दार

| Updated on: Mar 29, 2023 | 9:36 AM

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या बंडखोरीच्या वक्त्यावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार करताना बंड आणि गद्दारी आज फरक असतो असे सुनावलं आहे

महाफास्ट न्यूज 100 | राज्यातील सत्ता परिवर्तनावर तब्बल 9 महिन्यानंतर आता पडदा उठताना दिसत आहे. राज्याचे आरोग्य मंत्री भाजप नेते तानाजी सावंत यांनी यावर गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने शिंदे गटाने बंडखोरी केली असं म्हटलं आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या बंडखोरीच्या वक्त्यावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार करताना बंड आणि गद्दारी आज फरक असतो असे सुनावलं आहे. तसेच शिंदे गटाने बंड नाही तर गद्दारी केल्याची टीका राऊत यांनी केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाचून दाखवण्यासाठीही शेजाऱ्यांची आज्ञा घ्यावी लागते. शिंदे हे फक्त मुखवटा आहेत. राज्य तर फडणवीस चालवतात असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट आणि उद्ध ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यात सध्या चांगलाच वाद रंगला आहे. शिरसाठ यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अंधारे यांनी परळी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली. मात्र पोलिसांनी तक्रार घेतली नसल्याने अंधारे आता न्यायालयात जाणार आहेत. मात्र या आधी राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली आहे. तर छत्रपती संभाजी नगरच्या पोलीस आयुक्तांना 48 तासात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Published on: Mar 29, 2023 09:31 AM