दिवाळी कीटसह मुख्यमंत्री शिंदे आणि ठाकरे यांच्यासंदर्भातील बातम्या पहा महाफास्ट न्यूज 100 मध्ये

दिवाळी कीटसह मुख्यमंत्री शिंदे आणि ठाकरे यांच्यासंदर्भातील बातम्या पहा महाफास्ट न्यूज 100 मध्ये

| Updated on: Oct 20, 2022 | 7:40 PM

उद्धव ठाकरे लवकरच मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यात सभा घेणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच ठाकरे पोहरादेवीमध्ये ही जातील असेही माहिती मिळत आहे.

आता काही दिवसांवरच दिवाळी येऊन ठेपलेली आहे. राज्यातील जनता दिवाळी साजरी करण्यासाठी सर्व तयारी करत आहेत. याचदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटातील आपल्या आमदारांना महत्वाचा आदेश दिला आहे. शिंदे यांनी आपल्या आमदारांनी दिवाळी त्यांच्या मतदारसंघातच साजरी करावी असे म्हटलं आहे. तसेच आमदारांनी मतदारसंघात राहत जनसंपर्क वाढवा असेही शिंदे यांनी म्हटलं आहे. याचदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केलेल्या दिवाळी कीटचे साहित्य कोल्हापूरच्या गोडावूनमध्ये पोहचलं आहे. या कीटचं उद्या वाटप होण्याची शक्यता आहे. यादरम्यानच अमरावतीत दिवाळी कीट वाटपाच्या कार्यक्रमाचा बोजारा उडाल्याचे पहायला मिळत आहे. अमरावतीत अद्यापही दिवाळी कीट पोहचलेले नसल्याने नागरिकांना रिकाम्या हातानेच घरी परतावे लागत आहे. तर उद्धव ठाकरे लवकरच मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यात सभा घेणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच ठाकरे पोहरादेवीमध्ये ही जातील असेही माहिती मिळत आहे.

 

Published on: Oct 20, 2022 07:40 PM