फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांना टोला, पहा काय म्हणाले? यासह महाफास्ट न्यूज 100 मध्ये आणखीन काही बातम्यांचा आढावा
केंद्रातील सरकारचा अंतिम क्षण जवळ आला आहे. त्यामुळे किती पदं वाटायची आहेत ती वादू द्या असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
खरी शिवसेना कोणाची हे दाखवून दिलं असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंचं कौतूक केलं आहे. तर शिमग्यावर प्रतिक्रीया देत नसतात असा टोला ही फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दसरा मेळाव्यावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाना साधला आहे. तर दोन शाहीर मेळाव्यात भांडून लोकांचे मनोरंजन करतात, तसे दसरा मेळावे झाले असं पटोले म्हणाले. तर खरी शिवसेना कोणाची हे दाखवण्यासाठी दसरा मेळाव्यास गर्दी खेचण्याचे काम दोन्ही शिवसेनेकडून करण्यात आले होते. मात्र ही शर्यत शिंदेंनी जिंकल्याचे आकड्यावरून स्पष्ट होत आहे. शिवतिर्थावर 1 लाख शिवसैनिक तर बीकेसीवर 2 लाख कार्यकर्ते उपस्थित होते असा अंदाज मुंबई पोलिसांनी वर्तवला आहे. तर केंद्रातील सरकारचा अंतिम क्षण जवळ आला आहे. त्यामुळे किती पदं वाटायची आहेत ती वादू द्या असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.