डाळ, रवा , साखर कच्ची खायची काय? गॅस महाग झाल्याने वडेट्टीवार यांचा सवाल, यासह पहा इतर बातम्या महाफास्ट न्यूज 100 मध्ये
राज्य शासनाच्या दिवाळी किराणा सामान कीटवरून विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. गॅस सिलिंडर 1400 रूपये झाला आहे. मग डाळ, रवा , साखर ही काय कच्ची खायची काय असा सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे.
राज्य शासनाने घोषित केलेल्या दिवाळी किराणा सामान कीट सर्वसामान्यांपर्यंत पोहचत आहे. चंद्रपूरात दिवाळीच्या किराणा सामानाचं कीट दाखल झालं आहे. त्यामुळे उद्यापासून या किटचं वाटप सर्वसामान्यांना करण्यात येणार आहे. या किटमध्ये 100 रूपयात चार वस्तू असणार आहेत. एकीकडे दिवाळी किराणा सामान कीट पोहचत असतानाच काही ठिकाणी त्यासाठी नागरिकांना वाट पहावी लागत आहे. पुण्यातील पिंपरीमध्ये नागरिकांना अद्यापही दिवाळी किराणा सामान कीट मिळालेलं नाही. तर नाशिकमध्येही पुण्यापेक्षी काही वेगळं चित्र नसून येथेही दिवाळी किराणा सामान कीट पोहचलेलं नाही. त्यामुळे रेशन कीट मिळणार कधी असा सवाल नागरिक करत आहेत. राज्य शासनाच्या दिवाळी किराणा सामान कीटवरून विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. गॅस सिलिंडर 1400 रूपये झाला आहे. मग डाळ, रवा , साखर ही काय कच्ची खायची काय असा सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे.