राजकारणासह पहा राज्यातील नव्या अपडेट महाफास्ट न्यूज 100 मध्ये
मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्ष इशारा दिला. यावेळी शिंदे यांनी कोणाला अंगावर घ्यायचं असेल तर मी आहेच असं म्हटलं आहे.
राज्यातील शिवसेना कोणाची या वादानंतर शिंदे आणि ठाकरे हे वेगळे झाले आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आप आपली शिवसेना वाढविण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी अनेकांना आपल्या गटात घेण्याचा सपाटाच लावला आहे. यानंतर आता नाशिकमध्ये शिंदे गटाच्या पहिल्या शाखेचं उद्गाटन करण्यात आलं आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे याचं नाशिकमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्ष इशारा दिला. यावेळी शिंदे यांनी कोणाला अंगावर घ्यायचं असेल तर मी आहेच असं म्हटलं आहे. तर काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांनी जिहाद बाबत केलेल्या वक्तव्यावरून अनेकांच्या टीकेचे धनी बनले आहेत. पाटील यांनी कृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला असे म्हटलं आहे. त्यानंतर उद्भवलेल्या वादानंतर त्यांनी माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला असं म्हटलं आहे. तर सिंधुदुर्गात भास्कर जाधव आणि राणे यांच्यात सुरू असलेल्या वादाचे आता पुन्हा एकदा पडसाद उमटले आहेत. यावेळी निलेश राणे यांनी जाधव यांच्यावर टीका केली. तसेच जाधव हे चिपळूचा डुक्कर आहे. आणि त्याला चिखलात लोळवणारच असे राणे यांनी म्हटलं आहे.