काय घडतयं राज्यात? काय होतयं देशात? पहा राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा अढावा महाफास्ट न्यूज 100 मध्ये
मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी उत्तर दिलं आहे. तुम्ही मैदान सोडून पळ काढला आणि गद्दारी केली असे सावंत यांनी म्हटलं आहे.
राज्यात परतीच्या पावसाने मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. राज्यात ओला दुष्काळ घोषित करावा अशी मागणी होत आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. शेतकऱ्यांना हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही असे वक्तव्य मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात शिंदे सरकावर यांनी तोफ डागली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मदतीवर फक्त घोषणांचा पाऊस. अजून पंचनामेही नाहीत असा घणाघात थोरात यांनी केला आहे. याचदरम्यान शिंदे गटाचे नेते रामदार कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर दौऱ्यावरून टीका केली आहे. तसेच फक्त देखावा करण्यासाठीच उद्धव ठाकरे यांनी औरगांबाद दौरा केल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा आणि हे पद ठाकरेंकडे द्या असे ही कदम म्हणाले. तर मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी उत्तर दिलं आहे. तुम्ही मैदान सोडून पळ काढला आणि गद्दारी केली असे सावंत यांनी म्हटलं आहे.