मनसे नेते संदीप देशपांडे यांचा संजय राऊतांच्या वक्तव्यावर हल्लाबोल. पहा काय म्हणाले देशपांडे? महाफास्ट न्यूज 100 मध्ये
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांच्या जेलमधील वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. तसेच राऊत यांना जेलमधून बोलण्याचा अधिकार कोणी दिली असाही संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
कालच राज्यातील सुमारे 1000 च्या वर ग्रामपंचायतींचा निकाल लागला. यानिकालात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला चांगले यश आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधताना, गद्दारांना गाडून ग्रामपंचायतींवर भगवा फडकवला असे म्हणत राजन साळवी यांचे कौतूक केलं आहे. याचवेळी उद्धव ठाकरे यांनी आपण आता लवकरच महाराष्ट्र दौरा सुरू करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते बुलढाण्यातील अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटासह विविध पक्षांना धक्का देत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार आहेत. यावेळी त्यांच्याशी बोलत होते. भास्कर जाधव यांनी किरीट सोमय्यांसह राणे पिता-पुत्रांवर टीका केली आहे. तसेच बेडूक, कोंबडीवाल्यांच्या भ्रष्टाचारावर आता सौमय्या गप्प का असा हल्ला जाधव यांनी केला आहे. याचदरम्यान भास्कर जाधव यांनी नारायण राणे यांची मिमिक्री देखिल केली. तर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांच्या जेलमधील वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. तसेच राऊत यांना जेलमधून बोलण्याचा अधिकार कोणी दिली असाही संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.