मिमिक्रीप्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्या कोणावर झाला गुन्हा दाखल? पहा या अपडेटसह महाफास्ट न्यूज 100

मिमिक्रीप्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्या कोणावर झाला गुन्हा दाखल? पहा या अपडेटसह महाफास्ट न्यूज 100

| Updated on: Oct 12, 2022 | 7:21 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री करणे सुषमा अंधारेच्या अंगलट आलं आहे. त्यांच्यावर ठाण्याच्या नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मिमिक्रीप्रकरणी भास्कर जाधव यांच्यावर देखिल गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बीकेसी मैदानावर झालेल्या सभेची नक्कल केली होती.

अंधेरी पोटनिवडणूकीत काही गोंधळ होऊ नये यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच ऋतूजा लटके यांचा राजीमाना मंजूर झालाच नाही. तर दुसरा प्लॅन ठाकरे गटाकडून तयार करण्यात आला आहे. तर मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि प्रमोद सावंत यांची नावे अघाडीवर असल्याचेही समोर येत आहे. यादरम्यान लटके यांना रोखण्यासाठी शिंदे गटाकडून मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे. तसेच त्यांच्यावर दबाव टाकण्यात येत आहे असाही आरोप अनिल परब यांनी केला आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी न्यायालयाच्या बाहेर बसत आईला एक भावनिक पत्र लिहलं आहे. तर आपण अन्यायाच्या विरोधात लढत असल्यानेच लांब असल्याचेही त्यांनी त्या पत्रात म्हटलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री करणे सुषमा अंधारेच्या अंगलट आलं आहे. त्यांच्यावर ठाण्याच्या नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मिमिक्रीप्रकरणी भास्कर जाधव यांच्यावर देखिल गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बीकेसी मैदानावर झालेल्या सभेची नक्कल केली होती. तर गुन्हा दाखल करण्याआधी पोलिसांनी एकदा आपलं भाषण तपासायला हवं होतं असेही भास्कर जाधव म्हणाले. यादरम्यान बनावट प्रतिज्ञापत्रप्रकरणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची चौकशी कोल्हापूरात करण्यात आली. मुंबई क्राईम ब्राँचच्या टीमकडून येतील हातकलंगले पोलिस ठाण्यात पाच ते सहा कार्यकर्त्यांची चौकशी करण्यात आली. तर रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस केंद्राकडून जाहिर झाला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून 78 दिवसांचा पगार मिळणार आहे.

Published on: Oct 12, 2022 07:21 PM