उद्याची वाट न पाहता आजच लटकेंचा राजीनामा स्विकारावा, यासह पहा महाफास्ट न्यूज 100
मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी लटकेंवर पालिकेकडून खोटी केस केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान उद्याची वाट न पाहता आजच त्यांचा राजीनामा स्विकारावा असेही पेडणेकर म्हणाल्या.
आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. उद्या राजीनामा हतात आल्यानंतर आपण अंधेरी पोट निवडणूकीचा अर्ज भरणार असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी स्पष्ट केलं आहे. तर सत्याचा नेहमीच विजय होता असे अजित पवार यांनी ऋतुजा लटके यांच्याबाबत आलेल्या निकालावर बोलताना प्रतिक्रिया दिली. तर प्रत्येक वेळी आम्हाला कोर्टात जावं लागतं. हिम्मत असेल तर मैदानात या असे आवाहन शिंदे गटाला उद्धव ठाकरे दिलं. तर मी प्रत्येक्ष लढाईची वाट पाहत असल्याचेही त्यांनी सांगितलं. यादरम्यान चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटावर टीका करताना लटकेंना विनाकारण त्रास दिला गेल्याचे म्हटलं आहे. तर मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी लटकेंवर पालिकेकडून खोटी केस केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान उद्याची वाट न पाहता आजच त्यांचा राजीनामा स्विकारावा असेही पेडणेकर म्हणाल्या.