मनसे, भाजप आणि शिंदे नव्या युतीसह पहा राज्यातील महत्वाच्या घडामोडी महाफास्ट न्यूज 100मध्ये
शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्या दहशतीमुळेच काल दीपोत्सवानिमित्त राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आले. ठाकरेंच्या दहशतीमुळेच नव्या युतीचा प्रयत्न केला जात असल्याचेही दानवे म्हणाले.
राज्यात शिवसेनेत पडलेली फूट आणि त्यानंतर झालेले सत्तांतर यानंतर अनेकांनी भाजप दुसऱ्या राजकीय पक्षांना संपवत आहे अशी टीका होत होती. याचदरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी विरोधकांना राष्ट्रवादी फोडणं अशक्य असल्याचं म्हटलं आहे. तसेच शिवसेना आता उरलीच किती असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना निशाणा केला आहे. तसेच जे उरलेले आमदार आहेत ते सुद्धा आता मार्गावर आहेत असेही राणे यांनी म्हटलं आहे. यावेळी शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्या दहशतीमुळेच काल दीपोत्सवानिमित्त राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आले. ठाकरेंच्या दहशतीमुळेच नव्या युतीचा प्रयत्न केला जात असल्याचेही दानवे म्हणाले. तर शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी ठाकरे, शिंदे आणि भाजप नवी युती होण्यास कोणतीही अडचण नसल्याचे म्हटलं आहे. तर मनसे, भाजप आणि शिंदे गटाचा पाया हा हिंदुत्व आहे अशेही पाटील म्हणाले.