MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 10 AM | 03 October 2022 -TV9
आदित्य ठाकरेंच्या वरळीतील शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा प्रवेश म्हणजे आदित्य ठाकरेंना शिंदे गटाता धक्का मानला जात आहे.
खासदार रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे अमित शाहांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना शाहांनी त्यांच्या ऑफिसबाहेर 3 तास बसवून ठेवल्याचा मोठा खूलासा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. तर यानंतर आपण चौकशी केली असता, 3 तासानंतर ही भेटीची वेळ दिली गेली नसल्याचं खासदार रक्षा खडसे यांनी सांगितल्याचेही महाजन म्हणाले. आदित्य ठाकरेंच्या वरळीतील शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा प्रवेश म्हणजे आदित्य ठाकरेंना शिंदे गटाता धक्का मानला जात आहे. तर शिवसेना नेते आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांनी त्या अफवांना पूर्णविराम दिला आहे. नार्वेकर यांनी शिवतिर्थावर जात दसरा मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतला. तर जालन्यातून शिंदेंच्या दसरा मेळाव्याला एक हजात ते दीड हजार गाड्या जाणार असल्याची माहिती शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली.