मशालींचा वापर हा घरांना उद्धवस्त करण्यासाठी नका नारायण राणे यांचा सल्ला, याबातमीसह पहा महाफास्ट न्यूज 100
शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह मिळाल्यानंतर शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटासह भाजवर टीका केली आहे. यावेळी अंबादास दानवे यांनी ढाल भाजपची तर तलवार ही गद्दारांची असल्याचे म्हटले आहे.
उद्धव ठाकरे पाठोपाठ एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्ह दिलं आहे. आयोगाने शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह दिलं आहे. त्यानंतर शिवसेनेच्या मशाल विरोधात शिंदेंची ढाल तलवार मैदानात उतरणार अशी चर्चा होताना दिसत आहे. तर शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह मिळाल्यानंतर शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटासह भाजवर टीका केली आहे. यावेळी अंबादास दानवे यांनी ढाल भाजपची तर तलवार ही गद्दारांची असल्याचे म्हटले आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर मशालीवरून टीकास्र सोडलं आहे. तसेच मुख्यमंत्री असताना लोकांच्या घराला मशालीच लावल्या. तर मशालींचा वापर हा घरांना उद्धवस्त करण्यासाठी नका असा सल्लाही त्यांनी दिला आहे. तर शिवसेना आणि धनुष्यबाण यांच्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रीया दिली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सहानुभूती मिळत आहे. मात्र त्याचा फायदा त्यांना होणार नसल्याचे म्हटलं आहे. तसेच मुंबई महापालिकेची निवडणूक आपण स्वबळावर लढवणार. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तयार रहावे असेही राज ठाकरे म्हणाले.