ऋतूजा लटकेंसह, शिंदे -उद्धव ठाकरे गटात काय सुरू आहे? पहा नव्या अपडेट महाफास्ट न्यूज 100 मध्ये
अंधेरी पोटनिवडणूकीच्या उमेदवार लटकेंच्या राजीमान्यावरून अनिल परब यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. ऋतूजा लटकेंच्या राजीनाम्यासाठी आयुक्तांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप देखिल त्यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला निवडणूक आयोगाकडून नवे चिन्ह मिळाले आहे. परंतू पक्षाची ओळक असलेले धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शिवसैनिक हे शिंदे गटावर आपला राग काढताना दिसत आहेत. ते शिंदे गटासह भाजपवर टीका करत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून उद्धव ठाकरे गटाला टार्गेट करत आहेत. यादरम्यान त्यांनी आज देखिल शिंदे गटाला निशाणा केला. तसेच चिन्ह गोठवणाऱ्यांना राजकारणात गाडणार असेही ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते रायगडमधील उरण येथून भेटीसाठी आलेल्या शिवसैनिकांसमोर बोलत होते. तर 56 वर्षात 56 पाहिले असा टोलाही ठाकरे यांनी शिंदे गटाला लगावला आहे. तर अंधेरी पोटनिवडणूकीच्या उमेदवार लटकेंच्या राजीमान्यावरून अनिल परब यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. ऋतूजा लटकेंच्या राजीनाम्यासाठी आयुक्तांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप देखिल त्यांनी केला आहे. तर ऋतूजा लटकेंना शिंदे गटाकडून मंत्रिपदाची ऑफर दिली जात असल्याचेही परब यांनी म्हटलं आहे.