‘आदिपुरुष’ विरोधात हायकोर्टात पेटिशन दाखल करण्याचा कोणी दिला इशारा; मागणी काय?

‘आदिपुरुष’ विरोधात हायकोर्टात पेटिशन दाखल करण्याचा कोणी दिला इशारा; मागणी काय?

| Updated on: Jun 20, 2023 | 8:09 AM

देशभरातील चित्रपटगृहांमध्ये आदिपुरुष हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर देशभरातून या चित्रपटाला विरोध केला जात आहे. या चित्रपटावर संपूर्ण देशात बंदी घालण्याची मागणी देशभरातून होत आहे. ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष चित्रपट आता वादाच्या भवऱ्यात सापडला आहे.

नाशिक : आदिपुरुष चित्रपटावरून वाद सुरू आहे. संवादांवरून सुरू झालेला वाद आता थांबण्याचे नाव घेत नाही. देशभरातील चित्रपटगृहांमध्ये आदिपुरुष हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर देशभरातून या चित्रपटाला विरोध केला जात आहे. या चित्रपटावर संपूर्ण देशात बंदी घालण्याची मागणी देशभरातून होत आहे. ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष चित्रपट आता वादाच्या भवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटातील टपोरी संवादावर लोकांनी आक्षेप घेतला आहे. तर यावरूनच आता महंत देखील मैदानात उतरले आहेत. तसेच त्यांच्याकडून यावर तिव्र प्रतिक्रिया येत आहेत. यावरूनच महंत सुधीरदास महाराज यांनी ‘आदीपुरुष’ चित्रपटावर टीका केलीय. चित्रपटातील संवाद हे अपमानकारक, उद्धट आणि रामायणातील सुसंस्कृतपणा याला छेद देणारे असल्याचा आरोप महंतांनी केले आहे. तसेच जर चित्रपटातील संवाद बदलले नाही, तर लवकरात लवकर हायकोर्टात पेटिशन दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. देवी देवतांच्या तोंडी असंसदीय शब्द देणे, हे घोर निंदनीय असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Jun 20, 2023 08:09 AM