यवतमाळमध्ये भावना गवळी विरुद्ध ठाकरे यांचे महंत? ठाकरे गटाकडून इच्छुक नेत्याची तयारी सुरु, पाहा स्पेशल रिपोर्ट
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी यवतमाळ-वाशिममधून महाविकास आघाडीतून कोण लढणार हे अजून ठरलेलं नाही आहे. पण यवतमाळ वाशिम लोकसभेतून लढण्याची इच्छा मंहत सुनिल महाराज यांनी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासावर ठाकरे गटाने मला उमेदवारी दिली, तर वाशिम यवतमाळ लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी तयार असल्याचं महंत सुनिल महाराज म्हणाले.
वाशिम : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी यवतमाळ-वाशिममधून महाविकास आघाडीतून कोण लढणार हे अजून ठरलेलं नाही आहे. पण यवतमाळ वाशिम लोकसभेतून लढण्याची इच्छा मंहत सुनिल महाराज यांनी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासावर ठाकरे गटाने मला उमेदवारी दिली, तर वाशिम यवतमाळ लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी तयार असल्याचं महंत सुनिल महाराज म्हणाले. काही महिन्यांपूर्वी महंत सुनिल महाराज यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. भावना गवळी यांच्या विरोधात लढण्यासाठी माजी मंत्री संजय देशमुख आणि पोहरा देवी गडाचे महंत सुनील महाराज इच्छुक आहेत. यवतमाळ-वाशिममध्ये बंजारा समाजाची मतं महत्वाची ठरतात. शिवसेनेचे नेते संजय राठोड हे देखील त्याच मतांच्या जोरावर चार वेळा आमदार झाले. यवतमाळ तालुका हा सर्वाधिक मतदारसंघ असलेला तालुका आहे. 22 तालुक्यातून एक खासदार याठिकाणी निवडणून येतो. त्यामुळे 2024 मध्ये भावना गवळी विरुद्ध महंत सुनिल महाराज असा सामना रंगणार का? काय आहे यवतमाळ-वाशिम लोकसभेचं समीकरण यासाठी पाहा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट…