सर्वात मोठी बातमी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर

सर्वात मोठी बातमी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर

| Updated on: Feb 12, 2023 | 9:59 AM

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. वारंवार केल्या जाणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर कोश्यारी यांना मोठा विरोध झाला होता.

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. वारंवार केल्या जाणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर कोश्यारी यांना मोठा विरोध झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत औरंगाबादमधील कार्यक्रमात कोश्यारी यांनी वक्तव्य केलं. त्यांच्या या विधानाला कडाडून विरोध झाला. विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला होता. त्यांच्या या वक्तव्याविरोधात महाविकास आघाडीने महामोर्चाही काढला होता. तसंच कोश्यारी यांनीही काही दिवसांआधी आपल्याला पदमुक्त करण्यात यावं, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आज अखेर त्यांचा राजीनामा मंजूर झाला आहे.

Published on: Feb 12, 2023 09:33 AM