वाढतं वीजबिल अन् वीज तोडणीमुळे शेतकरी संतप्त; स्वाभिमानीचं चक्काजाम आंदोलन

वाढतं वीजबिल अन् वीज तोडणीमुळे शेतकरी संतप्त; स्वाभिमानीचं चक्काजाम आंदोलन

| Updated on: Feb 22, 2023 | 9:43 AM

स्वाभिमानी शेतकरी संघटना आज राज्यभर चक्काजाम आंदोलन करणार आहे. स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी ही माहिती दिलीय. पाहा...

सोलापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटना आज राज्यभर चक्काजाम आंदोलन करणार आहे. स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी ही माहिती दिलीय. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सत्ताधारी सोडा विरोधकांचंही लक्ष नाही. म्हणून आम्हाला मोर्चे काढावे लागतात. आज आम्ही राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करणार आहोत. बारावीच्या परिक्षामुळे 12 वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचं विजेचं बिल दुरुस्त करून द्यावं. वीजवितरण कार्यालयाने शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवावी. यासह वेगवेगळ्या प्रश्नांवर राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. वीज दरामध्ये करण्यात येणारी 37 टक्के दरवाढ आम्हाला मान्य नाही. फक्त पाच जिल्ह्यांमध्ये दिवसा वीज दिली आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Published on: Feb 22, 2023 09:41 AM