नाशिकमध्ये 3 वर्षाचा मुलगा तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याची घटना घडली
‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय देणारी एक घटना नाशिकमधून समोर आली आहे. अवघ्या तीन वर्षांचा चिमुरडा तिसऱ्या मजल्यावरुन (Third Floor) खाली पडला, मात्र केवळ नशीब बलवत्तर म्हणून तो सुखरुप बचवला.
नाशिक : ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय देणारी एक घटना नाशिकमधून समोर आली आहे. अवघ्या तीन वर्षांचा चिमुरडा तिसऱ्या मजल्यावरुन (Third Floor) खाली पडला, मात्र केवळ नशीब बलवत्तर म्हणून तो सुखरुप बचवला. या घटनेचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद (CCTV Camera) झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील (Nashik) निफाड तालुक्यातील ओझर येथील चांदनी चौकातील अलसना अपार्टमेंट येथे ही घटना घडली. फेयजान सद्दाम शेख हा तीन वर्षांचा मुलगा तिसऱ्या मजल्यावरुन थेट खाली रस्त्यावर पडला होता. मात्र तो आश्चर्यकारकरित्या बचावल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला.
Latest Videos